इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते संपन्न
Related Articles
- N.B. GUPTA, DIRECTOR (FINANCE), PFC WINS THE PRESTIGIOUS “CA CFO-PUBLIC SECTOR” AWARD 0
- NLCIL GRANDLY CELEBRATES 50th ENGINEERS DAY
- SAIL,AAI sign MoU to utilise airstrips under Udan scheme 0
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथून इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या अंधेरी शाखेचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पोस्ट खात्याच्या ‘आर्थिक समावेशन’ या विषयावरील विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच पोस्टाच्या पाच खातेधारकांना बँकेच्या क़्युआर कार्डचे वाटप करण्यात आले.
एकशे पासष्ट वर्षांची गौरवशाली परंपरा असलेले पोस्ट खाते भारतीय लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून विश्वास, पारदर्शकता व लोकसेवा ही पोस्ट खात्याची वैशिष्टे आहेत. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारी ही संस्था असून पोस्ट पेमेंटस बँकेमुळे बँकिंग सेवा देखील सामान्य लोकांच्या दारात पोहोचतील, असा विश्वास राज्यपालांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. पोस्ट पेमेंटस बँकेमुळे लोकांना अनेक बिले घरबसल्या भरता येईल, असे देखील राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला खासदार गोपाल शेट्टी, मुंबई परिक्षेत्राचे प्रधान पोस्ट मास्तर जनरल गणेश सावलेश्वरकर, पोस्टसेवा मुख्यालय येथील निदेशक सुमिता अयोध्या, डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
{१. छायाचित्रामध्ये राज्यपाल विद्यासागर राव डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे क़्युआर कार्ड देताना दिसत असून सोबत खासदार गोपाल शेट्टी, मुंबई परिक्षेत्राचे प्रधान पोस्ट मास्तर जनरल गणेश सावलेश्वरकर तसेच पोस्टसेवा मुख्यालय येथील निदेशक सुमिता अयोध्या या देखील दिसत आहेत.
२. छायाचित्रामध्ये राज्यपाल विद्यासागर राव राजभवन येथील कर्मचारी विलास मोरे यांना इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे क़्युआर कार्ड देताना दिसत आहेत.}