रोहयो मंत्र्यांच्या पुढाकाराने 183 कोटींचा निधी प्राप्त
Related Articles
- Assam Cabinet expansion: 2 new ministers added 0
- Haryana imposes night curfew from Dec 25 0
- RJD, JD-U will merge, say Lalu and Nitish
मुंबई, दि. 27 : राज्यातील रोजगार हमी योजनेसाठी प्रलंबित असलेला 183 कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याची माहिती पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास सचिवांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्यानंतर हा प्रश्न निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास सचिव अमरजित सिन्हा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यात महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजनेसाठी प्रलंबित असलेला 183 कोटींचा निधी तत्काळ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. याव्यतिरिक्त कुशल-अकुशलचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा व याबात तत्काळ कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी या भेटीदरम्यान केली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे रोहयोसाठी 183 कोटींचा निधी मिळणार आहे. या बैठकी दरम्यान, मंत्री श्री. रावल यांनी समूद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात ग्रामविकास सचिवांशी चर्चा केली.
